Chikkodi

सैन्यातून निवृत्त झालेले महावीर कोटे यांचे हिरेकोडीत स्वागत

Share

भारतीय सैन्यात तब्बल २३ वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेले सैनिक महावीर सुरेंद्र कोटे यांचे स्वग्राम हिरेकोडी (जि. चिकोडी) येथे आगमन होताच ग्रामस्थांनी स्वागत केले.

जीपमधून महावीर कोटे यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली; यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत जयघोष केला.

‘ऑपरेशन सिंधूर’ मोहिमेतील तांत्रिक सेवेबद्दल विशेष पदक मिळवलेल्या महावीर कोटे यांनी देशाच्या विविध भागांत कर्तव्य बजावले आहे.

या प्रसंगी सैनिक महावीर कोटे व त्यांच्या पत्नीने आई-वडिलांची पाद्यपूजा करून आशीर्वाद घेतले, तर त्यांच्या मित्रांनी शिक्षकांचा सत्कार केला.

स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी सैनिक संघटना आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत निवृत्त सैनिक महावीर कोटे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

Tags: