रायबाग तालुक्यातील नंदीकुरळी गावात विहिरीत पडलेल्या एका मोठ्या मगरीला वनविभागाने जेसीबीच्या साहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढून तिची सुटका केली आहे.

नंदीकुरळी येथील शेतकरी बालकृष्ण वागे यांच्या शेतातील विहिरीत एक मोठी मगर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते.

विहिरीत मगर असल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बचाव मोहीम सुरू केली.

काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जेसीबी आणि दोरखंडाचा वापर करून मगरीला विहिरीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
वेळेवर धावून येत मगरीला कोणतीही दुखापत न पोहोचवता तिची यशस्वी सुटका केल्याबद्दल ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.


Recent Comments