पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बेळगाव जवळील बडेकोळ्ळमठाजवळ लॉरी उलटून अपघात झाला. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून हिरेबागेवाडी पोलीस मदतकार्य करत आहेत.


बेळगाव तालुक्यातील बडेकोळ्ळमठाजवळ पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने लॉरी उलटली. या भागात पडत असलेल्या पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता, ज्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे. लॉरी रस्त्याच्या मध्येच उलटल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या साहाय्याने लॉरी बाजूला घेण्याचे काम सुरू केले.


या भागात एकाच आठवड्यात सहा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळ्यात या ठिकाणी योग्य सूचना फलक आणि रस्ते सुरक्षा उपायांचा अभाव असल्याने हे अपघात होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. बारंबार घडणाऱ्या अपघातांकडे महामार्ग प्राधिकरणाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.


Recent Comments