Belagavi

आसीफ सेठ फाऊंडेशनतर्फे एसडीआरएफ जवानांचा गौरव

Share

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या एसडीआरएफ जवानांना आवश्यक साहित्य आणि टी-शर्टचे वितरण आसीफ राजू सेठ फाऊंडेशनतर्फे करण्यात आले.

बेळगाव उत्तरचे आमदार आसीफ राजू सेठ यांनी त्यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून एसडीआरएफ जवानांना २०० टी-शर्ट तसेच बचाव कार्यासाठी आवश्यक सॉ मशीनचे वितरण केले. नैसर्गिक आपत्ती, पूर आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत एसडीआरएफ आणि पोलिस कर्मचारी बजावत असलेल्या सेवेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

पूर, जलप्रलय, खोल पाण्यातील बचाव मोहिमा तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये एसडीआरएफ कर्मचारी जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत असतात. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आवश्यक ते सहकार्य पुढेही कायम राहील, असे आसीफ राजू सेठ यांनी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव कार्यात कार्यरत असलेल्या एसडीआरएफ कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढावा यासाठी प्रत्येकाला दोन टी-शर्ट देण्यात आले. तसेच बचाव मोहिमांसाठी आवश्यक उपकरणांचेही वितरण करण्यात आले. यावेळी एसडीआरएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आसीफ राजू सेठ यांचा शाल देऊन सत्कार करत आभार व्यक्त केले.

Tags: