Belagavi

काळेनट्टी आणि अंकलगी गावात मूलभूत सुविधा पुरवण्याची मागणी

Share

बेळगाव तालुक्यातील काळेनट्टी आणि अंकलगी गावांतील प्रलंबित मूलभूत सुविधा तातडीने पुरवाव्यात, या मागणीसाठी ‘कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी राज्य युवा आघाडी’तर्फे बेळगावच्या जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.

सं संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश शिगीहल्ली यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, तालुका पंचायत आणि समाज कल्याण अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या.

काळेनट्टी गावात वाल्मिकी समुदाय भवन, स्मशानभूमी आणि खेळाचे मैदान नसल्याने नागरिक त्रस्त असल्याचे महेश यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच अंकलगी गावात गेल्या १५ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या वाल्मिकी भवनाचे काम अजूनही अपूर्णच असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या सर्व समस्या त्वरित न सोडवल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला.

Tags: