चिक्कोडीत हजारो शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा आणि तालुक्यातील सिंचन योजना तातडीने राबवण्यात याव्यात, या मागण्यांसाठी मोठे आंदोलन केले.


चिक्कोडी शहरातील बसवेश्वर चौकात जमलेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत मागण्यांकडे लक्ष वेधले. आंदोलनाचा भाग म्हणून प्रमुख रस्त्यावर बैलगाड्या उभ्या करून वाहतूक रोखण्यात आली.

या आंदोलनात कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच स्थानिक मठाधीश सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देताना त्यांनी सरकारने न्याय्य मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली.
कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे मानद अध्यक्ष शशिकांत गुरूजी, अध्यक्ष चुन्नप्पा पुजारी, उपाध्यक्ष सत्याप्पा मल्लापूरे, चिकोडीचे संपादन स्वामीजी आणि चिंचणीचे शिवप्रसाद देव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments