Belagavi

गुरुपौर्णिमेलाच गोमती गोमातेचा अखेरचा निरोप

Share

गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी बेळगावातील गणेशपूर येथील श्री शिवशक्ती महाकाळेश्वर मंदिरातील ‘गोमती’ गोमातेचे निधन झाले. गेल्या १२ वर्षांपासून मंदिर परिसरात असलेल्या गोमातेला धार्मिक विधींनी अखेरचा निरोप देण्यात आला.

बेळगावातील अयोध्यानगर गणेशपूर येथील श्री शिवशक्ती मानव कल्याण सेवा संस्थेच्या महाकालेश्वर मंदिरात २९ जुलै रोजी सकाळी ८.१५ वाजता गोमती गोमातेने अखेरचा श्वास घेतला. गुरुपौर्णिमेच्या दिवशीच तिचे निधन झाल्याने भक्तांनी हा प्रसंग भावपूर्ण असल्याचे सांगितले.

मंदिराच्या पुजारी रोशनी अम्माजी आणि स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत गोमातेवर धार्मिक विधींनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. बेनकनहळ्ळी पंचायत अध्यक्ष उमेश चोपडे, गोरक्षक निलेश तसेच पद्मप्रसाद होळी, निखिता, रणजित, हारून, नईम, राहुल, चिन्ना, सिद्धू, अभय यांच्यासह शेकडो भक्तांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.

Tags: