गायीला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करावे या मागणीसाठी बेळगावमध्ये साधू-संतांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.

शहरातील ऐतिहासिक राणी चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गायींसह हा मोर्चा काढण्यात आला. ‘गो सन्मान आव्हान अभियाना’अंतर्गत गोळा केलेल्या १ लाख ८० हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आले.

“शासनाने आणि राष्ट्रपतींनी गायीला तातडीने ‘राष्ट्रमाता’ घोषित करावे, अन्यथा २०२७ मध्ये दिल्लीत उपोषण केले जाईल,” असा इशारा श्री मुक्तानंद स्वामीजींनी दिला आहे.
याशिवाय स्वतंत्र गो-मंत्रालय स्थापन करावे आणि जखमी जनावरांच्या उपचारासाठी २४ तास रुग्णवाहिका सेवा सुरू करावी, अशी मागणी गो-रक्षकांनी केली आहे.
शासनाने मागण्या मान्य न केल्यास २०२७ मध्ये बंगळूरमध्ये साधू-संतांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.


Recent Comments