Belagavi

बेळगावच्या तहसीलदार कचेरीची दुरवस्था

Share

नवी दिल्लीतील कर्नाटक भवनात उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यात राज्यातील मेकेदाटू व म्हादयी प्रकल्पांची सद्यस्थिती आणि धरणांमधील पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

सुमारे १८५१ च्या काळात उभारण्यात आलेल्या या ऐतिहासिक इमारतीत आज तहसीलदार कार्यालय, पेन्शन विभाग आणि रेशन कार्ड विभागासह ३ ते ४ महत्त्वाची शासकीय कार्यालये कार्यरत आहेत. बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातून दररोज हजारो नागरिक येथे कामानिमित्त येतात. मात्र, एकेकाळी देखणी दिसणारी ही वास्तू आज झाडे-झुडपे उगवून पूर्णपणे विद्रुप झाली आहे.

कार्यालय उघडताच विजेअभावी अंधाराचे साम्राज्य पसरलेले दिसते. पावसाळ्यात छतातून पाणी गळत असल्याने कार्यालयात चिखल होतो, ज्यामुळे नागरिकांना उभे राहणेही कठीण जाते. भिंतींना मोठ्या भेगा पडल्याने आत जाण्यास लोक घाबरत आहेत. याशिवाय, आवारात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने त्रास सहन करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली.

प्रशासन आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सरकारने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घ्यावी आणि या ऐतिहासिक वास्तूची दुरुस्ती करून सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे, असे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

Tags: