चिक्कोडीतील जमीन संपादनग्रस्त शेतकऱ्यांना योग्य व वाढीव भरपाई मिळावी, या मागणीसाठी ३० जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनात आमदार गणेश हुक्केरी यांनी सहभागी व्हावे, अन्यथा निषेध करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सत्यप्पा मल्लापूरे यांनी दिला.

चिक्कोडी तालुक्यातील हालट्टी येथे आयोजित शेतकरी शाल दीक्षा कार्यक्रमात ते बोलत होते. जमीन संपादनामुळे शेतकरी उपजीविकेचे साधन गमावत असून, सरकारने निश्चित केलेली भरपाई अपुरी असल्याचा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदारांनी हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा. ३० जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनस्थळी आमदार गणेश हुक्केरी यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा आंदोलन तीव्र करून आमदारांविरोधात निषेध व्यक्त केला जाईल, असा इशारा सत्यप्पा मल्लापूरे यांनी दिला.


Recent Comments