Chikkodi

चिक्कोडी : विहिरीत आढळला संशयास्पद मृतदेह

Share

चिक्कोडी तालुक्यातील बेडकिहाळ येथे एका विहिरीत पुरुषाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याची घटना घडली आहे.

अमित अशोक चौगुले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गेल्या आठवड्याभरापासून ते बेपत्ता होते. गावातील एका विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. अपघाताने पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे हा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीबाहेर काढला. सदलगा पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

Tags: