चिक्कोडी तालुक्यातील देसाई इंगळी गावात रविवार १९ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

मराठा समाजाचे नेते शंकर पवार, अनिल पाटील आणि ॲडव्होकेट बी. आर. यादव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रविवार १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता माजी मंत्री व आमदार संतोष लाड यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन होईल. हा सोहळा डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, श्री मंजुनाथ महास्वामीजी, श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि श्री बसवलिंग महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात पार पडेल.

या सोहळ्याला बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पद्मश्री प्रभाकर कोरे, आमदार प्रकाश हुक्केरी आणि बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, पुतळा उभारणीसाठी सहकार्य करणारे आमदार गणेश हुक्केरी यांचा नागरी सत्कार केला जाईल.
या कार्यक्रमाला खासदार प्रियांका जारकीहोळी, माजी मंत्री श्रीमंत पाटील, अजितसिंग निंबाळकर देसाई सरकार, महांतेश कवटगीमठ, अमित कोरे, सुप्रिया पाटील उपस्थित राहणार आहेत. रमेश पवार यांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे १० हजार शिवभक्त उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या पत्रकार परिषदेला बाळासाहेब पाटील, अण्णासाहेब शिंदे, अशोक अडसुळे, अण्णासाहेब पवार, निलेश धाबडे, संजय बामणे, धनाजी घोसरवाडे, राजू जाधव, अजित पवार, संजय जाधव, पिंटू मगसुळे, राजू जत्राटे, राजू देसाई, राजू तनपुरे, पांडुरंग माने आणि गणपती धनवडे उपस्थित होते.


Recent Comments