ग्रामीण भागातील जनतेच्या सुविधेसाठी विविध गावांमध्ये समुदाय भवने बांधण्यात आली आहेत, असे प्रतिपादन खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. रायबाग मतदारसंघातील विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.

खासदार जारकीहोळी यांनी नागरमुन्नोळी गावात बसस्थानक, रस्ते, शासकीय रुग्णालय आणि गटार बांधकामाचा शुभारंभ केला. तसेच उमराणी, मुगळी, डोणवाडा, करगाव आणि कुंगटोळी गावांमध्ये नूतन डॉ. बी. आर. आंबेडकर समुदाय भवनांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. संकेश्वर-जेवरगी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू झाले असून करोशी येथील ऐतिहासिक शाळेचा विकास केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.



यावेळी काँग्रेस नेते महावीर मोहिते, सिद्धप्पा मयायी, शिवू मयायी, सुरेश घरबुडे, रुद्रप्पा संगप्पगोळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शिवनगौडा पाटील, निर्मला पाटील, अर्जुन नाईकवाडे, हाजी मुल्ला, ॲड. रामप्पा पुजारी यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Recent Comments