बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी गावाजवळ हा अपघात झाला. धडक इतकी तीव्र होती की, एका चालकाने घटनास्थळीच प्राण गमावले. अपघातातील जखमीची प्रकृती चिंताजनक असून त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही कित्तूर तालुक्यातील वीरापूर गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, याप्रकरणी कित्तूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Recent Comments