राष्ट्रीय महामार्ग ४ वरील हत्तरगी टोल नाक्याजवळ मध्यरात्री रस्ते अपघात झाला. कंटेनर चालकाने समोरील ट्रकला मागून जोरात धडक दिल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. यमकनमर्डी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हत्तरगी टोल नाक्याजवळील हंचनाळ गावच्या शिवारात असलेल्या शिवप्रसाद हॉटेलजवळ ही घटना घडली. कमी वयाचा तामिळनाडूतील दिंडीगुल जिल्ह्यातील कुपैपट्टी येथील रहिवासी जयकुमार एस सेल्लादुराई वय ३४ वर्षे असे अपघातात मृत्यू झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. तो आपल्या ताब्यातील कंटेनर क्रमांक (TN 42 AS 1566) घेऊन संकेश्वरकडून बेळगावच्या दिशेने जात असताना, समोर असलेल्या महाराष्ट्रातील ट्रक क्रमांक (MH 12 TV 6767) वर त्याचा कंटेनर मागून धडकला. या अपघातात चालक जयकुमार याचा जागीच मृत्यू झाला. ट्रक क्लिनर प्रताप बाबूराव तिडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून यमकनमर्डीचे सीपीआय जावेद मुशापुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



Recent Comments