Belagavi

केएलएस जीआयटी महाविद्यालयात योगासन स्पर्धा संपन्न

Share

बेळगावमधील केएलएस गोगटे तांत्रिक महाविद्यालयात ‘योगासन स्पर्धा २०२६’ उत्साहात पार पडली. महाविद्यालयाच्या कली कडून आयोजित या स्पर्धेत विविध भागांतील तरुण योगपटूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या प्रमुख योगासन स्पर्धेचे उद्घाटन केएलएस व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र बेळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. योग ही केवळ शारीरिक कसरत नसून मन शांत ठेवणारी आणि संतुलित जीवन जगण्यास शिकवणारी एक उत्तम कला आहे, असे राजेंद्र बेळगावकर यांनी म्हटले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय अठावले आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ. जॉर्ज रॉड्रिग्ज उपस्थित होते. त्यांनी उपस्थित युवा पिढीला योगसाधनेचे महत्त्व पटवून दिले.

या स्पर्धेत बेळगाव, हुबळी, गोकाक, दावणगेरे आणि मुन्नोळी यांसह विविध भागांतील ८५ हून अधिक योगपटूंनी सहभाग घेतला होता. ८ ते २५ वर्षांवरील एकूण चार वेगवेगळ्या वयोगटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धकांनी सादर केलेली कठीण आसने उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. अनुभवी योगतज्ज्ञ मुरलीधर प्रभू, रश्मी चव्हाण यांच्यासह पाच जणांच्या परीक्षक मंडळाने विजेत्यांची निवड केली.

Tags: