ARREST

बेकायदेशीर दारू विक्रेत्यासह दोन गांजाबाजांना अटक

Share

बेळगावमध्ये बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम राबवत हिरेबागेवाडी आणि टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छापे टाकून बेकायदेशीर दारू विक्री आणि गांजाचे सेवन करून धिंगाणा घालणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे.

बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हिरेबागेवाडी-बस्लापूर रस्त्यावरील सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे दारू विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बसवराज चंद्रशेखर धुळप्पणावर याला पोलीस उपनिरीक्षक बसवराज मिटगार आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून अटक केली. अटक केलेल्या संशयिताकडून सुमारे ३ हजार ५८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत, टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम पूजेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील आरपीडी आणि जैन कॉलेजजवळआकाश बसूर आणि अभिषेक हरिजन या तरुणांना गांजाचे सवण केल्याप्रकरणी ताब्यात घेतले.

या कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Tags: