Accident

हुबळीजवळ भीषण अपघात; कार-ट्रकच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

Share

चालत्या ट्रकच्या पाठीमागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्यामुळे कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री घडली आहे.

हुबळीहून गदगच्या दिशेने अवजड मशीन घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या पाठीमागून येणाऱ्या कारने शिरगुप्पी गावाजवळ अत्यंत वेगात धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून, कारचालक आणि सहप्रवाशाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह कारमधून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ‘किम्स’ रुग्णालयात पाठवले आहेत. अपघातातील मृत व्यक्तींबाबत अद्याप अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. याप्रकरणी हुबळी ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags: