संकेश्वरमध्ये सोलापूर क्रॉसजवळ पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. एका टेम्पो ट्रॅव्हलरमधून सुमारे १४ प्रवासी महाराष्ट्रातील इचलकरंजी येथून गडहिंग्लजजवळील शिंदेवाडी येथे लग्नासाठी जात होते. हुक्केरी तालुक्यातील सोलापूर क्रॉसजवळ टेम्पो पोहोचला असता त्याची कारसोबत जोरदार धडक झाली.

ही धडक इतकी भीषण होती की, टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्यावरच तीन वेळा कोलांटउड्या घेतल्या. या भीषण अपघातात टेम्पोमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत बचावकार्यात मदत केली.


Recent Comments