बागलकोट पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसच्या प्रचारादरम्यान शिवजयंतीच्या मिरवणुकीत झालेल्या दगडफेक प्रकरणी अटकेत असलेल्या एका हिंदू कार्यकर्त्याच्या आईने काँग्रेस नेत्यांना प्रश्नांच्या भडीमाराने निरुत्तर केले.

बागलकोट मधील पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आज एका आईचा आक्रोश पहायला मिळाला. शिवजयंती मिरवणुकीतील दगडफेक प्रकरणी अटकेत असलेला हिंदू कार्यकर्ता शिवू अंबिगेर याच्या आईने काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या नेत्यांसमोर आपले गाऱ्हाणे मांडले. “माझ्या मुलाने कोणताही गुन्हा केलेला नाही, तरीही तो ४५ दिवसांपासून तुरुंगात खितपत पडला आहे. मला रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असूनही मी सर्वांचे पाय धरले, पण कोणीही मदत करत नाही. निवडणूक संपू द्या, असे सांगून केवळ वेळ मारून नेली जात आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपले दुःख व्यक्त केले.
हिंदू धर्माच्या नावावर राजकारण करणारे नेते निष्पाप लोक तुरुंगात गेल्यावर कुठे जातात, असा रोकडा सवाल या महिलेने उपस्थित केला. महिलेचा हा वाढता संताप पाहून प्रचारासाठी आलेले नेते चांगलेच इक्कटीत सापडले होते. या घटनेमुळे बागलकोटमधील निवडणुकीच्या रिंगणात आता नवीन चर्चा सुरू झाली आहे. अशा भावना तेथील नागरिकांमध्ये उमटत आहेत.


Recent Comments