बेळगाव येथील शहापूर परिसरात असलेल्या संकट विमोचन हनुमान मंदिरात मारुती जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवाच्या सांगता समारंभा निमित्त आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला असून संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

शहापूर येथील कचेरी गल्ली, महात्मा फुले रोडवर स्थित संकट विमोचन हनुमान मंदिरात शनिवारी सायंकाळी मारुती जन्मोत्सव सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान जयंतीपासून सुरू झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांची शनिवारी महाप्रसादाने सांगता झाली. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
शहापूर कचेरी गल्लीत १९९१ मध्ये श्री मारुती मंदिराची स्थापना करण्यात आली. काळानुरूप भाविकांच्या सहकार्यातून या ठिकाणी भव्य मंदिराची उभारणी झाली असून, दरवर्षी हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यंदाही सुमारे पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती प्रवीण चतूर यांनी दिली.
हा महाप्रसाद उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिव सम्राट युवक मंडळासह स्थानिक भाविकांनी परिश्रम घेतले. मंदिर परिसरात भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. हनुमान नामाच्या जयघोषाने संपूर्ण शहापूर परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी अत्यंत भक्तीभावाने मारुतीरायाचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त केले.


Recent Comments