Belagavi

रिक्षाचालकांच्या गॅस टंचाईवर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Share

बेळगाव शहरातील रिक्षाचालकांना गेल्या काही दिवसांपासून भेडसावणारी एलपीजी गॅसची टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली असून, या समस्येवर लवकरच तोडगा निघणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

बेळगावमध्ये आज प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी रिक्षाचालकांच्या एलपीजी समस्येबाबत माहिती दिली. शहरात सध्या ७ सीएनजी पंप असून तिथे पुरवठा सुरळीत आहे, मात्र ६ एलपीजी पंपांपैकी काही खासगी पंपांवर पुरवठ्याची समस्या जाणवत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी मल्लिकार्जुन कलादगी यांची जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते लवकरच संबंधित घटकांची बैठक घेऊन ही समस्या मार्गी लावतील, असे मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

व्यावसायिक वापराच्या एलपीजीबाबत सध्या दिवसाला ७०० सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. लहान व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हॉटेल असोसिएशनशी चर्चा करण्यात आली असून, बहुतांश हॉटेल व्यावसायिकांनी पर्यायी व्यवस्था केल्याने सध्या मोठी समस्या नसल्याचे मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.

Tags: