केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून काँग्रेस आणि मित्रपक्षांनी लागू केलेल्या लोककल्याणकारी योजनांची नावे बदलण्याचे सत्र सुरू झाले असून, ही लोकशाहीतील मोठी शोकांतिका असल्याची टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी केली.

केंद्रातील भाजप सरकारची ही शेवटची सत्ता आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. बेळगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अग्रभागी असलेल्या महात्मा गांधींचे नाव योजनांमधून वगळण्याचा प्रयत्न करणे अत्यंत अयोग्य असल्याचे के. एच. मुनियप्पा यांनी म्हटले. नरेगासारख्या महत्त्वपूर्ण योजनेचे नाव बदलून भाजपने घाणेरडे राजकारण थांबवावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
बिहार निवडणुकीत पंच गॅरंटी योजनांचा निधी वापरल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. राज्य सरकारच्या या योजना भाजप नेत्यांना सहन होत नसल्यानेच ते बिनबुडाचे आरोप करत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे खालच्या पातळीवरील राजकारण करणे लोकशाहीला शोभा देत नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.


Recent Comments