Belagavi

गॅरंटी योजनांतील गैरव्यवहाराच्या आरोपांना अधिवेशनात उत्तर देऊ : मंत्री महादेवाप्पा

Share

राज्यातील काँग्रेस सरकारच्या गॅरंटी योजनांमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा विरोधी पक्षांनी केलेला आरोप विधानसभेतच खोडून काढू, असे स्पष्टीकरण मंत्री डॉ. एच.सी. महादेवाप्पा यांनी दिले आहे.

बेळगाव मध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले. यासोबतच, दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या भेटीचा उद्देश केवळ पक्षाच्या एका विशिष्ट सभेपुरता मर्यादित होता, असेही त्यांनी सांगितले.

“विरोधी पक्ष गॅरंटी योजनांमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करत आहेत. त्याला उत्तर देण्यासाठीच अधिवेशन सुरू आहे. आम्ही अधिवेशनातच उत्तर देऊ,” असे महादेवाप्पा यांनी स्पष्ट केले. दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींची भेट घेता आली नाही का, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, मत चोरीबाबत बैठक बोलावली होती. त्या बैठकीला सर्व नेते, मंत्री गेले होते. तो विषय केवळ त्या बैठकीपुरता मर्यादित होता,” असे मंत्री महादेवाप्पा यांनी स्पष्ट केले.

Tags: