Belagavi

“३४ गावांमध्ये असलेल्या कित्तूर संस्थानाच्या खुणा जपा” : हनुमंत निराणी

Share

३४ गावांमध्ये असलेल्या कित्तूर संस्थानाच्या ऐतिहासिक खुणांचे संरक्षण करून, ऐतिहासिक कित्तूर किल्ला आणि कित्तूर संस्थानाचा विकास करण्यासाठी सरकारने भरीव अनुदान द्यावे, अशी मागणी सदस्य हणमंत निरानी यांनी विधान परिषदेच्या सभागृहात केली.

आज विधान परिषदेच्या शून्य प्रहरात बोलताना सदस्य हणमंत निरानी यांनी सांगितले की, कित्तूर किल्ला आणि संस्थानाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या प्राधिकरणाने केलेला विकास केवळ स्वप्नच राहिला आहे. प्राधिकरणावर सदस्यांची नियुक्ती झालेली नाही. वर्षभरात केवळ ₹५३ कोटी रुपये इतकाच निधी वितरित झाला आहे.

भाजप सरकारच्या काळात ₹११३ कोटी रुपयांमध्ये किल्ल्याची प्रतिकृती उभारण्याची योजना होती. मात्र, काँग्रेसने मागच्या बाजूला प्रतिकृती उभारण्यास विरोध केल्याने ती योजना रखडली आहे. ७ एकर जागेवर थीम पार्कला मंजुरी मिळाली असूनही सरकारने अद्याप निविदा काढलेली नाही. तसेच, ३४ गावांमध्ये असलेल्या ऐतिहासिक खुणांची दुरवस्था होत आहे. स्मारकांच्या विकासासाठी अधिक निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Tags: