राज्य सरकारने हमी योजनांच्या अंमलबजावणीत जनतेची फसवणूक केली आहे. सरकारने आपली चूक प्रामाणिकपणे मान्य करावी आणि दोषींवर तातडीने कारवाई करावी, असे विधान विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केले.

आज सुवर्णसौधसमोर प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र संताप व्यक्त केला. हमी योजनांच्या अंमलबजावणीत झालेल्या त्रुटींसंदर्भात आम्ही विधानसभेत पुराव्यासह माहिती दिली आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी यावर केवळअसमाधानकारक उत्तर दिले, अशी टीका विरोधी पक्षनेत्यांनी केली.

“चूक झाली असेल, तर सरकारने ती प्रामाणिकपणे स्वीकारायला हवी. तसे न करणे हा जनतेचा आणि सभागृहाचा अवमान आहे. या चुकांसाठी कोणावर तरी निश्चितपणे कारवाई होणे आवश्यक आहे,” असे आर. अशोक म्हणाले.
“या गंभीर विषयावर संबंधित मंत्र्यांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर तरी तात्काळ कार्यवाही करावी,” असा आग्रह त्यांनी धरला. सरकारची ही भूमिका सभागृहाचा अपमान करणारी असून, ती लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.


Recent Comments