ग्रामविकास मंत्री प्रियंक खर्गे हे उत्तर देण्याच्या स्थितीत नसल्यामुळे सभागृहात उपस्थित राहत नाहीत. देशाला घेऊन जी काळजी त्यांना वाटते, त्यापैकी ५ टक्के तरी काळजी त्यांनी आपल्या खात्याबद्दल घ्यावी, असा टोला आमदार डी.एस. अरुण यांनी लगावला आहे.

आज सुवर्णसौधसमोर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. ग्रामविकास मंत्री प्रियंक खर्गे हे उत्तर देण्याच्या स्थितीत नसल्यामुळे सभागृहात येत नाहीत. राज्यात ग्रंथपालांची समस्या गंभीर आहे. त्यांच्या बैठकीलाही मंत्री प्रियंक खर्गे उपस्थित राहत नाहीत. त्यांना विधिमंडळाच्या कामकाजाचे गांभीर्य नाही. त्यांच्या मतदारसंघात एका महिला कर्मचाऱ्याने आत्महत्या केली, तरी त्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली, असे डी.एस. अरुण म्हणाले. ९ महिने उलटून गेले, तरी त्यांच्या खात्याला मंजूर झालेल्या अर्थसंकल्पापैकी केवळ १६ टक्केच वापर करण्यात आला आहे. “तुम्हाला देशाला घेऊन जी चिंता आणि काळजी वाटते, त्यापैकी ५ टक्के तरी काळजी त्यांनी आपल्या खात्याबद्दल ठेवावी,” असे त्यांनी म्हटले.



Recent Comments