बेळगावमधील कित्तूर राणी चन्नम्मा लघु प्राणीसंग्रहालयामध्ये काळविटांच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर सरकारने तातडीने चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केली आहे.
गेल्या एका आठवड्यात बेळगावजवळील भूतरमनाहट्टी येथील प्राणीसंग्रहालयात एकूण ३० हून अधिक काळविटांचा मृत्यू झाल्याची माहिती आपणास आहे. लहान मुलांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या उत्तर कर्नाटकातील या प्राणीसंग्रहालयाचा हवा तितका विकास झालेला नाही. येथील कर्मचाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे एवढ्या मोठ्या संख्येने काळविटांचा बळी जाणे अत्यंत दुःखद आहे. यापूर्वी येथे एका सिंहाचाही मृत्यू झाला होता.
“या काळविटांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींवर सरकारने त्वरित चौकशी करून दोषींना शिक्षा करावी,” अशी मागणी यावेळी त्यांनी केली. प्राणीसंग्रहालयात जनावरांना दिल्या जाणाऱ्या चारा आणि खाद्यपदार्थांची अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक होते, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी नगर अध्यक्ष आनंद करलिंगण्णावर, नगर सचिव नागेश कांबळे, जिल्हा सचिव स्वरूप कालकुंद्री, उमेश चिंडक, हेमंत हवळी, राघवेंद्र कट्टी, विजय जाधव, विवेक रेवणकर, वादिराज गांगुर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.


Recent Comments