Bagalkot

बागलकोटमध्ये १५ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Share

बागलकोट जिल्ह्याच्या जमखंडी तालुक्यातील आलहूर पुनर्वसन केंद्रात शिक्षण घेणाऱ्या एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मृत मुलाचे नाव आकाश हेद्दारी (वय १५) असून, तो जमखंडी येथील डिस्ट्रिक्ट बंजारा एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये नववीत शिकत होता. आज, घरी कोणी नसताना त्याने गळफास लावून घेऊन जीवन संपवले.

घटनेची माहिती मिळताच जमाखंडी ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मुलाच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय आहे, याबद्दल पोलीस माहिती गोळा करत आहेत. या विद्यार्थ्याच्या निधनामुळे कुटुंबीय आणि स्थानिकांना मोठा धक्का बसला असून, पोलिसांच्या तपासानंतरच आत्महत्येच्या कारणांचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

Tags: