Bagalkot

आमदार, मंत्र्यांमुळे समाजाचा उद्धार अशक्य : बसवजय मृत्युंजय स्वामीजी

Share

आमदार विजयानंद काशप्पनवर यांनी बसवजय मृत्युंजय स्वामींना लक्ष्य ठेवून केलेल्या टीकेला बसवजय मृत्युंजय स्वामीजींनी प्रत्त्युत्तर दिले असून कोणत्याही मंत्री किंवा आमदारांमुळे समाजाची प्रगती शक्य नाही अशी टीका केली आहे.

बागलकोटमध्ये माध्यमांशी बोलताना स्वामीजी म्हणाले, “मंत्री आणि आमदार पदामुळे समाजाचा उद्धार झालेला नाही. आमदार झाल्यावर केवळ काही जणांनी न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, पण इतरांनी काय केले हे सर्वांना माहीत आहे.
आरक्षणामुळेच समाजाला न्याय मिळू शकतो, असे ते म्हणाले.

“मंत्री किंवा आमदार झाल्यावरही त्यांनी आरक्षणासाठी किती प्रमाणात संघर्ष केला, हे सर्वांना माहीत आहे. मंत्रिपद कोणालाही देणे किंवा न देणे हे मुख्यमंत्री ठरवतील. लोकांनी आता निर्णय घेतला आहे. कोणत्याही मंत्री किंवा आमदारांमुळे समाजाचा उद्धार होणार नाही. आरक्षणासाठी जे प्रामाणिकपणे लढतील, त्यांच्यामुळेच समाजाची उन्नती शक्य आहे,” असे त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले.

आरएसएसवरील निर्बंधाच्या संदर्भात बोलताना स्वामीजी म्हणाले, “देशात राष्ट्रप्रेम जागृत करणाऱ्या अनेक संघटना कार्यरत आहेत. राजकारण्यांनी त्यांच्याबद्दल तुच्छपणे बोलू नये. सर्वांचे त्यांच्या-त्यांच्या संघटनांशी भावनिक संबंध आहेत,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

Tags: