बागलकोट जिल्ह्यातील बादामी तालुक्यातील कुलगेरी क्रॉसजवळ झालेल्या भीषण अपघातात सुट्टीवर गावी आलेल्या भारतीय लष्कराच्या एका जवानाचा जागीच मृत्यू झाला.

हनुमंत हट्टी (२६) असे मृत जवानाचे नाव आहे. ते बदामी तालुक्यातील सोमनकोप्पा गावचे रहिवासी होते. पाच वर्षांपूर्वी ते सैन्यात दाखल झाले होते. सध्या ते आरआरएमईजी रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. हनुमंत हट्टी यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. केरुर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


Recent Comments