Bagalkot

इनोव्हा कार-टमटमची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू!

Share

बागलकोट जिल्ह्यातील बीळगी येथे इनोव्हा कार आणि टमटम यांच्यात मध्यरात्री झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

बागलकोट जिल्ह्यातील बीळगी तालुक्यात अनगवाडी पुलाजवळ ही दुर्घटना घडली. मरण पावलेले दोघे नवनगर येथील ४५ सेक्टरमधील रहिवासी असून त्यांची नावे महेश नाईकर (२७) आणि मेहबूब शेख (३०) अशी आहेत. विशाल वरतिल्ले, विजयकुमार भोवी आणि गुरुप्रसाद सुनकद हे तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाच लोक टमटम वाहनातून विजापूर जिल्ह्यातील कोल्हार येथे जेवण करून बागलकोटच्या दिशेने परतत असताना हा अपघात झाला. महिंद्रा पिकअप वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात इनोव्हा कार चालकाच्या असावधपणामुळे विरुद्ध दिशेने येत असलेल्या टमटमला धडक बसून हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच कलगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे.

Tags: