Bagalkot

बागलकोट जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

Share

बागलकोट जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळपासून सुरू असलेल्या या संततधार पावसाने जिल्ह्यातील नागरिक हैराण झाले आहेत.

बागलकोट शहर, विद्यागिरी आणि नवनगर परिसरात पाऊस थांबलेला नाही. या मुसळधार पावसामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसात भिजतच मुलांना शाळेतून घरी जावे लागत आहे. संपूर्ण बागलकोट जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून वरुणराजाच्या या कृपेने नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांत अडथळे निर्माण झाले आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे, तर पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी, सार्वजनिक तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे.

Tags: