उत्तर कर्नाटकातील जलमय शहराच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना प्रवासादरम्यान मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी शहराच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाच्या रस्त्यांचे काम अर्धवट स्थितीत थांबल्यामुळे संपूर्ण शहराचे रस्ते खड्डेमय झाले असून, यामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे, असा आरोप नागरिक करत आहेत. प्रशासनाने त्वरित यावर उपाययोजना करून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.


Recent Comments