बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी शहराचे आराध्य दैवत असलेल्या काडसिद्धेश्वराच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ‘रोटी यात्रेने’ म्हणजेच भाकऱ्यांच्या नैवेद्याने धार्मिक उत्सवाचा उत्साह वाढवला.

या यात्रेनिमित्त बनहट्टी आणि आसपासच्या गावांमधून हजारो भाविकांनी मंदिरात येऊन आपल्या घरी बनवलेली भाकऱ्यांची शिदोरी काडसिद्धेश्वराला अर्पण केल्या. यामध्ये महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता. महिलांनी स्वतः भाकरी घेऊन या यात्रेत सहभाग घेतला. यात्रेनिमित्त रात्री फटाक्यांची आतषबाजी करून उत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यात आला. यात्रेत महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले होते.


Recent Comments