Vijayapura

विजापूरमध्ये ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

Share

विजापूर जिल्ह्यात एका दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, त्याचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात ताळिकोटी-मुद्देबिहाळ रस्त्यावर ताळिकोटी शहरात झाला.

रियाज डोनूर (वय ३५) असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर त्याचा मुलगा हरमान रियाज डोनूर (वय ७) या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रकचालक भीरप्पा अगसबाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला ट्रकसह ताब्यात घेतले आहे. या घटनेची नोंद ताळिकोटी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Tags: