Dharwad

धारवाडमध्ये डीजेच्या दणदणाटावरून गोंधळ, पोलिसांचा लाठीमार

Share

गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान दोन डीजेच्या दणदणाटामुळे धारवाडमधील नरेंद्र गावात पोलिसांनी लाठीमार केला.

धारवाड तालुक्यातील नरेंद्र गावातील दोन गल्ल्यांमधील गणेशमूर्तींचे विसर्जन शनिवारी केले जात होते. यावेळी, दोन डीजे लावण्यात आले होते. या डीजेचा आवाज ऐकण्यासाठी शेकडो लोक जमले होते. एक तासाहून अधिक काळ दोन्ही डीजे एकमेकांसमोर उभे राहून दणदणाट करत असल्याने धारवाड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी गोंधळलेल्या जमावावर सौम्य लाठीमार करून त्यांना पांगवले. त्यामुळे लोक सैरावैरा पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी डीजे बंद केले आणि शांततेत गणेशमूर्तींचे विसर्जन होईल याची काळजी घेतली.

Tags: