Belagavi

ईदच्या दिवशी गणेशोत्सवातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

Share

गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील पिरनवाडी येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे चित्र पाहायला मिळाले. या दोन्ही सणांच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी गणपती बाप्पाची आरती करून सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.

ईद-ए-मिलादच्या सणानिमित्त पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री बाल गणेश मंडळाने आपल्या शुक्रवारच्या आरतीचा मान मुस्लिम बांधवांना दिला. यामुळे या भागात हिंदू-मुस्लिम ऐक्य अधिक स्पष्टपणे दिसून आले. या विशेष प्रसंगी मुस्लिम बांधवांनी समाजात शांतता आणि एकता राहावी तसेच श्री गणेशाने सर्वांना आनंद द्यावा अशी प्रार्थना केली. यावेळी गणेशोत्सव मंडळाचे अनेक कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधवांसह नारायण मुचंडीकर उपस्थित होते.

Tags: