बेळगाव शहरातील जैन युवा संघटनेने आठ दिवसांचे आचार्य श्री शांतिसागर संस्कार शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचा पहिला टप्पा कुडची गावात सुरू झाला असून, १,००० हून अधिक लोकांनी यात सहभागी होऊन शिबिर यशस्वी केले.

या शिबिराचे उद्घाटन बेळगावचे माजी आमदार संजय पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी शांतिनाथ दिगंबर जैन मंदिराचे विश्वस्त महेंद्र पाटील, शीतल पाटील, शरत पाटील, महावीर पाटील, नगरसेवक बसवराज मुदगेकर, युष पाटील, सुनील पाटील, तसेच महिला मंडळ, युवक मंडळ, बालिका मंडळ, परिसरातील गावातील श्रावक-श्राविका आणि जैन युवा संघटना, बेळगावचे पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिराचा पुढील टप्पा उद्या बस्तवाड गावात होणार आहे. जैन युवा संघटनेच्या वतीने सर्व जैन श्रावक-श्राविका, बालिका मंडळ आणि युवक मंडळांना या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments