बेळगाव तालुक्यातील कडोली गावातील कचेरी गल्लीच्या श्री शिवसमर्थ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री कलमेश्वर मंदिराची आकर्षक प्रतिकृती उभारून भाविकांचे लक्ष वेधले आहे. गणेशोत्सवानिमित्त दररोज होणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे भक्तांमध्ये उत्साह वाढला आहे.

या वर्षी श्री शिवसमर्थ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कडोली गावामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला. मंडळाने मुलांना मनोरंजन आणि तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दररोज बाल हरिपाठ, भजन, इस्कॉन बेळगावच्या वतीने हरिनाम संकीर्तन, प्रवचन, महिला भजन, सत्यनारायण पूजा, महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या वर्षी मंडळाने एक खास कल्पना राबवली असून, गावातील ऐतिहासिक श्री कलमेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारून लोकांची मने जिंकली आहेत.
विलास मायाण्णा, महेश पाटील, प्रमोद पाटील आणि नागेश पावणोजी या दाम्पत्यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा आणि महाआरती पार पडली. या वेळी श्रीधर नाडगौडा यांनी पौरोहित्य केले. शिरोळी बुद्रुक गावातील बाल हरिपाठ आणि भजन मंडळाच्या कलाकारांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. भक्तगण मोठ्या उत्साहात पूजा, महाआरती आणि महाप्रसादात सहभागी झाले.
मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.


Recent Comments