Belagavi

बेळगावात रॅपिड ॲक्शन फोर्सचे पथसंचलन

Share

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स आणि स्थानिक पोलिसांनी पथसंचलन केले. कोणत्याही प्रकारची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांकडून कडक संदेश देण्यात आला आहे.

आज काकती आणि बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे पथसंचलन करण्यात आले. सणासुदीच्या काळात समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी पोलीस विभागाने हा कठोर इशारा दिला आहे.

Tags: