बेळगावमध्ये युवा जनोत्सवाच्या निमित्ताने एड्स रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा क्रीडांगणावर या ‘युवा जनोत्सव मॅरेथॉन 2025’ स्पर्धेला सुरुवात झाली. ही मॅरेथॉन बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बेंगळुरूची कर्नाटक राज्य एड्स प्रिव्हेंशन सोसायटी, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, पोलीस आणि माहिती व प्रसिद्धी विभाग, जिल्हा युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभाग, तसेच जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण युनिट यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना न्यायाधीश संदीप पाटील म्हणाले, “लोकांमध्ये एड्सविषयी जनजागृती करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपले शरीर जन्मापासून मृत्यूपर्यंत आपले जीवनसाथी असते, त्यामुळे ते निरोगी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.” अशा प्रकारच्या जनजागृतीपर कार्यक्रमांमुळेच देवदासींसारख्या कुप्रथांना आपण दूर करू शकलो, असेही ते म्हणाले. “विद्यार्थ्यांनीही आपापल्या गावांमध्ये जनजागृती करावी. आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि तुमचे आयुष्य, तुमचे आरोग्य तुमच्या हातात आहे”, असे आवाहन त्यांनी केले.
शहरातील विविध मार्गांवरून ही मॅरेथॉन धावली. यात विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, अधिकारी आणि इतर अनेक लोकांनी सहभाग घेतला.


Recent Comments