Dharwad

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी घेतले सार्वजनिक गणपतींचे दर्शन

Share

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी रात्री उशिरा धारवाड शहरातील पाचपेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले.

या वेळी त्यांनी धारवाडमधील टिकारे रोड, सुभाष रोड, हेब्बोळी अगसीसह इतर अनेक ठिकाणी बसवलेल्या गणपतींची आरती केली. या भेटीदरम्यान त्यांनी गणेश मंडळाच्या सदस्यांशीही संवाद साधला.

यावेळी त्यांच्यासोबत हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या महापौर ज्योती पाटील आणि भाजपचे इतर अनेक नेते उपस्थित होते.

Tags: