Belagavi

उद्यमबागमध्ये जीवघेणा हल्ला; तीन आरोपी गजाआड

Share

कारखान्यातील काम संपवून घरी परतणाऱ्या एका कामगारावर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात बेळगाव उद्यमबाग पोलिसांना यश आले आहे.

उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे. दि. ३०/०८/२०२५ रोजी मध्यरात्री, आकारा फाउंड्रीज कारखान्यातून काम आटोपून घरी परतणाऱ्या राजेंद्र कुमार बारिक आणि सत्यरंजन बेहेरा यांच्यावर गजानन नगर येथे दोन अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने हल्ला केला होता. या घटनेची तक्रार उद्यमबाग पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस आयुक्त बोरसे भूषण गुलाबराव यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक स्थापन करण्यात आले . प्रज्वल आनंद पाटील, मयूर कृष्णा गुरव आणि विशाल वसंत अल्लोळकर यांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली हिरो कंपनीची मोटरसायकल आणि लोखंडी रॉड जप्त करण्यात आला आहे. या कामगिरीत सहभागी झालेल्या पोलिसांचे कौतुक होत आहे.

Tags: