सरकारने आरक्षणाच्या वर्गीकरणातील त्रुटी दूर न केल्यास, बंजारा, भोवी, कोरच आणि कोरवा समाज ४ सप्टेंबर रोजी बेळगावात आंदोलन करेल, तर १० सप्टेंबर रोजी बेंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती भाजप एससी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रभू राठोड यांनी दिली.

शनिवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य निकष आणि जातीनिहाय सर्वेक्षण करणे आवश्यक असताना, भाजप सरकारने दिलेले आरक्षण वाढवण्याऐवजी काँग्रेस सरकारने बंजारा, भोवी, कोरच आणि कोरमा या चार जातींसाठी ४.५ टक्के आणि भटक्या समाजासाठी १ टक्का आरक्षण दिले आहे. हे अन्यायकारक असून, आताच्या काँग्रेस सरकारने ६३ जातींना एकत्र करून आरक्षण जाहीर करत आमच्यावर अन्याय केला आहे’, असा आरोप राठोड यांनी केला.
यावेळी राज्याच्या प्रत्येक तांड्याला, तालुक्याला आणि जिल्ह्याला भेटी देऊन सर्व अनुसूचित जातींच्या लोकप्रतिनिधींशी आणि तज्ज्ञांशी चर्चा करून माहिती घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.


Recent Comments