Belagavi

बेळगावात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जनजागृती रॅली

Share

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बेळगावात आज राणी चन्नम्मा विद्यापीठ आणि सांगोळी रायन्ना फर्स्ट ग्रेड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅली काढण्यात आली. आज मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने बेळगावातील राणी चन्नम्मा विद्यापीठ आणि सांगोळी रायन्ना फर्स्ट ग्रेड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी “अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळांमध्येही रस घेऊन आपले शरीर निरोगी ठेवावे. निरोगी आयुष्यासाठी खेळांची भूमिका महत्त्वाची आहे.” तसेच, एका विद्यार्थिनीने योग आणि ध्यानाचे महत्त्वही सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी, “खेळ केवळ शारीरिकच नाही तर मानसिक धैर्यही वाढवतात. त्यामुळे सर्वांनी खेळांमध्ये सहभागी व्हावे,’ असे आवाहन केले. प्रोफेसर डॉ. एम.एच. जाधव यांनी “आपण दररोज क्रीडा दिन साजरा करायला हवा. जय-पराजय महत्त्वाचा नाही, तर खेळांमध्ये आवड निर्माण करणे महत्त्वाचे आहे,” असे म्हटले. श्रीनगर कॉलेजमधून सुरू झालेली ही रॅली सुभाष नगर, आरटीओ क्रांतीवीर सांगोळी रायन्ना सर्कल आणि कोर्ट रोड मार्गे राणी चन्नम्मा सर्कलला सांगता झाली.. यात ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Tags: