सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिराच्या विकासकामांसंदर्भात बेळगावचे खासदार आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून मंदिराच्या विकास कामांची सविस्तर माहिती घेतली. मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच, ‘प्रसाद’ योजनेतून १८ कोटी रुपये, असे एकूण ११८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या निधीतून होणाऱ्या कामांची माहिती घेत शेट्टर यांनी भाविकांच्या सोयीसाठी सर्व कामे लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सध्या १० कोटी रुपयांच्या विकास कामांना लवकरच सुरुवात केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी खासदारांना दिली.
या बैठकीत प्रशिक्षणार्थी आयएएस अभिनव जैन हे देखील उपस्थित होते. याबाबतची माहिती खासदारांच्या कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.


Recent Comments