Dharwad

हुबळी-धारवाडमध्ये ‘चिगरी’ बसचा अपघात

Share

हुबळी-धारवाड या शहरांमध्ये राबवण्यात आलेल्या बीआरटीएस प्रकल्पातील ‘चिगरी’ बसमुळे होणारे अपघात थांबण्याचे नाव घेत नाहीत. दररोज या बसमुळे काही ना काही अपघात घडतच आहेत. आता पुन्हा एकदा एका ‘चिगरी’ बसने पादचाऱ्याला धडक दिल्याने ती चर्चेत आली आहे.

धारवाडमधील नवलूर पुलाजवळ एका ‘चिगरी’ बसने एका पादचाऱ्याला धडक दिली, यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अचानक रस्त्यावर उतरून बीआरटीएस रस्ता बंद करत आपला संताप व्यक्त केला.

जवळपास एक तास नागरिकांनी रस्ता अडवून बीआरटीएस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकल्पाच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी करत हा प्रकल्पच रद्द करण्याची मागणी केली. रस्ता बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. जवळपास तासभर हे आंदोलन सुरू होते.

Tags: