बेळगावला राज्याची दुसरी राजधानी म्हटले जाते. मात्र, बेळगाव तहसील कार्यालयाची अवस्था अतिशय दयनीय आहे. जोरदार पावसामुळे कार्यालयाच्या छताला गळती लागली असून, अधिकारी आणि नागरिकांना पावसाच्या पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पाऊस सुरू झाला की कार्यालयाच्या आत आणि बाहेर सर्वत्र पाणीच पाणी होते. यामुळे अधिकारी आणि कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. बेळगाव राज्याचा दुसरा मोठा जिल्हा असूनही तहसीलदारांसाठी स्वतःची इमारत नसणे ही एक शोकांतिका आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या महापालिका इमारतीमध्येच सध्या हे कार्यालय सुरू आहे.
हे कार्यालय तात्काळ दुरुस्त करावे किंवा नवीन इमारत बांधावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


Recent Comments