Belagavi

जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करून दिला आदर्श

Share

बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आपल्या कार्यालयात पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली असून, त्यांच्या या कृतीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी राणी चेन्नम्मा चौकातील श्री गणेश मंदिरात पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची पूजा केली. त्यानंतर कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत मिरवणुकीने गणेशमूर्ती जिल्हाधिकारी कार्यालयात आणून तिची स्थापना केली. विशेष म्हणजे, यावेळी विघ्नहर्त्याकडे त्यांनी जिल्ह्यात शांतता, सलोखा आणि समृद्धी कायम राहू दे अशी प्रार्थना केली. त्यांच्या या कृतीमुळे बेळगावकरांनी त्यांचे कौतुक केले आहे.

याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होणकेरी, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Tags: